top of page
Psychiatric disorder and mental illness treatment

मानसिक ​आजारातून सावरत असताना घ्यायची काळजी 
#psychiatrist, #psychology, #treatment

मानसिक ​आजारातून सावरत असताना रुग्ण व नातेवाईक यांनी काय काळजी घ्यावी या विषयी माहिती देणार लेख. 

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Instagram

मानसिक आजारातून सावरताना काय काळजी घ्याल? 

 

मानसिक आजारातून सावरताना, उपचार संपवून रुग्णालयातून डिसचार्ज घेताना रुग्ण व काळजीवाहू नातेवाईक यांच्या मनात अनेक शंका व प्रश्न असतात. पुष्कळ वेळेला, मानसोपचार तज्ञांशी बोलून देखील काही शंका राहतात, किंवा संकोचामुळे अनेकदा सर्व शंका विचारल्या जात नाहीत. ही प्रश्नावली बहुतेक प्रश्नांची उत्तरे देईल. या प्रश्नावलीत विचारलेले बहुतेक प्रश्न रुग्णांनी आमच्या psychiatrist यांना विचारलेले आहेत व त्या अनुभावतून ही यादी लिहिलेली आहे. 

 

1. घरी गेल्यावर रुग्णासोबत कसे वागावे?  
हा प्रश्न विचारण्यामागे अनेकदा नातेवाइकांच्या मनातील भीती किंवा अपराधी पणाची भावना असते. अनेकदा, मानसिक आजार, व त्याची लक्षणे यांना आपले वागणे, किंवा घरातील वातावरण हेच एकमेव कारण आहे असा समज नातेवाईकांचा असतो. घरामध्ये कोणत्याही आजारातून सावरणार्या व्यक्तीसोबत जसे वागतात, तसेच रुग्णाशी वागावे: म्हणजेच, काळजी व प्रेमाने वागावे, मात्र आजारी आहे, बिचारा आहे अशी दयेची वागणूक देऊ नये. रुग्णाला रुग्ण म्हणून न वागवता माणूस म्हणून वागवावे. 

 

2. रुग्णाने मांसाहार केला तर चालेल का?
हा प्रश्न विचारण्यामागे साधारणत: शाकाहारी जेवण सात्विक, व मांसाहार म्हणजे तामसी हा समज असतो. मानसिक आजार हे सर्व प्रकारचे भोजन करणार्यांना होतात, शुद्ध शाकाहारी, निर्व्यसनी व अगदी vegan असणार्यांनाही होतात, व मांसाहार करणार्यांनाही होतात. शक्यतो उपचार सुरु असताना, दवाखान्यात अॅडमिट असताना, किंवा विद्युत उपचार सुरु असताना, शाकाहारी जेवण करा, मांसाहार करायचाच असेल, तर घरी बनवलेले ताजे, गरम व कमी तेलकट जेवण करा एवढेच पथ्य सांगितले जाते. हे सांगताना बाहेरचे खाऊन पोट बिघडले, तर उपचारामध्ये व्यत्यय येतो हे एकमेव कारण आहे. 

 

3. कामावर कधी पासून रुजू होता येईल?
या प्रश्नाचे उत्तर ढोबळमानाने देता येणार नाही. प्रत्येक काम, कामामधील गरजा, कौशल्य, वेळ, कष्टाची पातळी या गोष्टी वेगवेगळ्या असतात.  तरी उपचार झाल्यानंतर निदान १५ दिवस घरी राहून सावरणे (recovery) याचा सल्ला दिला जातो.

 

4. recovery होत असताना विश्रांती आवश्यक आहे का?
विश्रांती ही मनाला आवश्यक आहे, शरीराला नाही. त्यामुळे शारिरीक आजार, किंवा आॉपरेशन नंतर जसे बेड रेस्ट सांगितलेली असते, तशी विश्रांती गरजेची नाही. recovery काळात रुग्णाने घरी राहणे, परंतु घरातील छोटि छोटी कामे करणे, स्वत:ची काळजी घेणे, सामानाची आवराआवर, स्वच्छता, खरेदी, हिशोब इ कामे करणे चांगले आहे. हे केल्याने शरीराला व मनाला सवय लागते, तसेच कोणत्या बाबतीत recovery झालेली आहे, काय जमू शकते, कशात अडचण येते याचा अंदाज येतो व त्यानुसार पुढील उपचार ठरतात. मनाला विश्रांती, म्हणजे ज्या कामाची जबाबदारी असते, किंवा ज्यात चूक झाल्यास नुकसान किंवा इजा होण्याची शक्यता असते, 

 

5. व्यायाम किंवा ध्यान केल्याने फायदा होतो का?
  व्यायाम केल्याने निश्चित मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. मात्र त्यासाठी व्यायाम करण्याचे काही नियम पाळणे आवश्य आहे. ते नियम व ते फायदे जाणून घेण्यासाठी व्यायामासंबंधी चा हा लेख जरुर वाचा. https://www.dmckolhapur.com/depression-exercise . व्यायामासंबंधी अजून काही शंका असतील तर मोकळेपणे तुमच्या psychiatrist सोबत बोला.

 

6. कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे?
आजारातून सावरताना, डिसचार्ज घेतल्यावर, किंवा विद्युत उपचार सुरु असताना, एकट्याने मोठा प्रवास करणे, वाहन चालवणे, जागरण करणे, टाळावे. उपचार पूर्ण झाल्यावर, व recovery चा काळ संपल्यावर या गोष्टी मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने हळू हळू कराव्यात. मद्यपान, किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन करणे पूर्णत: टाळावे.

 

7. कोणत्या गोष्टी जरुर कराव्यात?
   १। जेवण, औषधे व झोप यांच्या वेळा ठरवून घ्या.
   २। औषधे सुरक्षित ठिकाणी ठेवा. ती निगराणीखाली न चुकता द्या. 
   ३। नियमित व्यायाम करा. 
   ४। जमेल तशी घरातील कामे करण्यास सुरुवात करा. 
   ५। सकस व पोषक अन्न खा. पुरेसे (दिवसातून २-३ लिटर) पाणी प्या.

8. कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे? 

  आजारातून बरे होत असताना, खालील गोष्टी अडचणी निर्माण करू शकतात: 

    - नवीन उद्भवलेला शरीरीक आजार; जसे ताप, उलट्या, जुलाब, ब्लड प्रेशर, किंवा इतर कोणताही

    - कमी झालेली भूक किंवा झोप; असे झाल्यास तत्काल तुमच्या मानसोपचार तज्ञ यांच्याशी संपर्क साधा. 

    - औषधे नीट घेतली जात आहेत की नाही ते पाहणे: अनेकदा, थोडे बरे वाटू लागल्यावर रुग्ण औषधे घेण्यास कंटाळा करतात, किंवा आजार पुनः डोके वर काढू लागतो तेव्हा औषधाची गरज वाटत नाही. हे धोकादायक आहे, कारण त्यामुळे आजार पुनः डोके वर काढतो, आणि वेळ व्यय जातो. 

​या व्यतिरिक्त कोणतीही शंका असल्यास, तुमच्या psychiatrist, किंवा मानसोपचार तज्ञ डॉक्टर यांच्याशी संपर्क करा. 

Contact

Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre

331, E, Off Wilder Memorial Church. New Shahupuri.

Kolhapur. 416001. Maharashtra, India. 

Phone: +91-9167577279

bottom of page