top of page
Search
Writer's pictureDevavrat Harshe

मानसोपचार सुरु करत असताना घ्यायची काळजी: रुग्ण व नातेवाईक दोघांसाठी महत्वाचे.

Updated: Apr 17, 2023

मानसिक आजारांवर (psychiatric illness) उपचार घेताना, रुग्ण व नातेवाईक यांच्या मनात अनेक शंका असतात. साधारण या शंका येण्याची कारणे म्हणजे:

१) मानसिक आजार व आरोग्य याबाबतची भीती, व गैरसमज.

२) उपचारांबाबतच्या शंका, व काळजी.




अनेकदा, मनातल्या शंका मोकळेपणे न विचारणे, किंवा काही शंका अर्धवट विचारणे, यामुळे गैरसमज होणे, चुकीची माहिती किंवा अर्धीच माहिती मिळणे यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. हे होऊ नये, यासाठी खालील काळजी घ्या.

१। शक्यतो, रुग्णासोबत, जी व्यक्ती जास्तीत जास्त वेळ असते, किंवा, जिला रुग्णाबाबत, व त्याच्या आजाराबाबत जास्तीत जास्त माहिती आहे, अशा व्यक्तीने मानसोपचारतज्ञांसोबत (psychiatrist) चर्चा करताना असणे गरजेचे आहे. मानसिक आजारांमधील अनेक लक्षणे, ही शारिरीक आजारांप्रमाणे पटकन् दिसणारी, नसतात. अनेकदा, ती छुपी, किंवा बारकाईने पाहिल्यास दिसणारी, तसेच, रुग्णाला मूळत: अोळखणार्या व्यक्तीला पटकन समजतात. त्यामुळे जर अशी व्यक्ती डॉक्टरांसोबत (psychiatrist) चर्चा करताना असेल, तर डॉक्टरांना आजाराची पूर्ण माहिती मिळते, तसेच, रुग्णाची, माहिती मिळून निदान करणे सोपे होते. अनेकदा एकेकटे राहणारे लोक, जसे हॉस्टेल वर राहणारे विद्यार्थी, किंवा बदली होत असणारे कर्मचारी देखील रुग्ण असतात. अशा वेळेस, जर डॉक्टरना इतर काही माहिती हवी असेल, किंवा इतर काही कारणामुळे नातेवाईकांसोबत चर्चा करण्यास डॉक्टरांनाी सांगितले, तर त्याचा सकारात्मक रित्या विचार करावा.


२। जर वेळ असेल, व शक्य असेल, तर psychiatrist ना पहिल्यांदा भेटण्यापूर्वी आपल्याला डॉक्टरांसोबत काय बोलायचे आहे, काय शंका विचारायच्या आहेत, आजाराची लक्षणे, इतर काही महत्वाच्या गोष्टी यांची नीट नोंद जवळ ठेवून द्या. अनेकदा, बोलण्याच्या अोघात, महत्वाचा मुद्दा विसरतो, व त्यासाठी पुन्हा थांबून भेटावे लागते. हे टाळण्यासाठी, जर शक्य असेल, तर मुद्द्यांची यादी किंवा नोंद तुमच्या जवळ ठेवा.


३। आजारासंबंधी कोणतीही गोष्ट psychiatrist पासून लपवू नका. एखादी वैयक्तिक बाब जर संवेदनशील वाटत असेल, तर तिला बगल देऊन देखील आजाराची पूर्ण माहिती तुम्ही देऊ शकता. तुम्ही डॉक्टरांना सांगितलेली आजारासंबंधीची प्रत्येक गोष्ट ही confidentiality (गुप्तता) कराराने बांधलेली असते. त्यामुळे मोकळेपणाने तुमच्या समस्या सांगा.


४। आजारासंबंधी सांगताना, तडजोड करु नका, किंवा लक्षणांवर पांघरुण घालू नका. उदा: “डॉक्टर, तसा तो खूप हुशार आहे, पण…..” किंवा “डॉक्टर मला खरं तर तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण..” असे केल्याने आपली समस्या तितकी मोठी नाही असा समज उगाचच अनेकदा तयार होतो. जी समस्या आहे, ती मोकळेपणाने, व आडपडदा न ठेवता सांगा.


५। psychiatrist नी उपचार, जसे औषधे, जीवनशैली बदल, व्यायाम, किंवा मानसोपचार (psychotherapy) सुचवल्यास, त्यांबाबत च्या सर्व शंका डॉक्टरांशी बोलून त्या मिटवून घ्या. त्या विषयी अधिक वाचन करायचे असल्यास, तशा साधनांसंबंधी डॉक्टरांकडून माहिती घ्या.


६। औषधे विकत घेताना, प्रिस्क्रिपश्न वर दिलेली संख्या, व मिळालेल्या गोळ्यांची संख्या ताडून बघा. काहीही शंका असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

मानसिक आजारावरील उपचार व त्यापासून मुक्तता करण्यात रुग्णासोबत, त्याचे कुटुंबिय, मित्र, सहकारी व नातेवाईक यांचा मोठा सहभाग असतो. उपचार घेत राहणे, जीवनशैली बदलणे, व्यायाम करणे या सगळ्या गोष्टी उपचारांना मदत करतात.




47 views0 comments

Comments


bottom of page