top of page
Depression Treatment in Kolhapur

Electroconvulsive therapy Service
 

Highly effective, safe, painless and time tested treatment for depression and psychiatric illnesses. 

 

Deilvered by one of the best team of psychiatrist, physician and anaesthesiologist in Kolhapur.

सुरक्षित, गुणकारी, वेदनारहित उपचार.

  • Facebook
  • Twitter
  • Instagram

धन्वंतरी नर्सिंग होम न्यूरोसायकीयाट्री सेंटर गेली 40 वर्षे कोल्हापूर (Kolhapur) व जवळच्या परिसरातील गावातून येणाऱ्या रुग्णांसाठी विद्युतउपचार ही सेवा चालवत आहे. या उपचाराचा वापर करून, 1) गंभीर नैराश्य, 2) इतर उपचारांनी बरे न होणारे नैराश्य व तत्सम मानसिक आजार, 3) स्किजोफ्रेनिया, 4) बायपोलर आजार या सारख्या आजारांची लक्षणे नियंत्रणात आणणे, रोग मुक्ती च्या दिशेने पाऊल टाकणे, व जीवनाचा दर्जा उंचावणे शक्य आहे.

विद्युत उपचार (electroconvulsive therapy) कोणत्या परिस्थितीत वापरले जातात? 

प्रत्येक मानसिक आजारामध्ये, किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी विद्युत उपचाराची गरज नसते. मात्र, खालील परिस्थिती मध्ये, मानसोपचार तज्ञ (psychiatrist) हे ठरवून (elective/planned) किंवा तातडीने (emergency) विद्युत उपचार सुचवू शकतात. 

  • अतिशय गंभीर नैराश्य: 

    • झोप, भूक पूर्णत: नष्ट होणे, 

    • आत्महत्येचे विचार येणे व त्यानुसार कृती करणे/प्रयत्न करणे/तयारी करणे. 

    • नैराश्य व लक्षणे यामुळे शरीरीक आरोग्य धोक्यात येणे. 

  • चिवट नैराश्य: 

    • दीर्घ कालीन नैराश्य असेल, किंवा 

    • औषधोपचार किंवा इतर उपचार पद्धती यांना दाद  न देणारे नैराश्य असेल. 

  • गंभीर मानसिक आजार 

    • स्किजोफ्रेनिया, बायपोलर आजार 

    • चिवट, उपचारांना दाद न देणारे मानसिक आजार. 

  • आजारातून पटकन मुक्त होण्याची गरज

  • औषधे/इतर उपचार वापरण्यावर विविध कारणांमुळे असणारी बंधने/निर्बंध/मर्यादा

धन्वंतरी नर्सिंग होम न्यूरोसायकीयाट्री सेंटर हे 1981 पासून Kolhapur मध्ये विद्युत उपचार सेवा देत आहे, व ही सेवा देण्यात अग्रेसर आहे. ही सेवा सुरक्षित आणि अधिकाधिक गुणकारी व्हावी यासाठी लागणारे प्रशिक्षण, अनुभव व मेहनत घेऊन मानसोपचार तज्ञ (psychiatrist), भूलतज्ञ (anaesthesiologist), नर्सिंग स्टाफ (nursing staff) यांची कुशल व तत्पर टीम हे या केंद्राचे बलस्थान आहे. 

 

विद्युत-उपचार: महत्वाची माहिती: 

 

विद्युत उपचार केवळ मानसोपचारतज्ञ (psychiatrist) देऊ शकतात. भारतात सुधारित विद्युत उपचार (modified ECT) देण्यात येतात. सुधारित म्हणजे संपूर्ण भूल देऊन, स्नायू शिथिल करून दिलेले विद्युत उपचार जे पूर्णत: वेदनारहित असतात.  

विद्युत उपचार हे बाह्यरुग्ण (oPD/daycare) स्वरूपात घेत येतात, तसेच आंतररुग्ण (ipd/admission) करून घेत येतात. या दोन्ही पैकी कोणत्या स्वरूपात उपचार घ्यायचे हा निर्णय आजाराची स्थिति, लक्षणांची तीव्रता व रुग्ण/नातेवाईकांची सोय या तिन्ही गोष्टी विचारात घेऊन घेतला जातो.  .उपचाराचे एक सत्र पूर्ण होण्यास 10 - 15 मिनिटे लागतात, व रुग्णाला पूर्ण सावरायला साधारण 1-2 तास लागतात.बाह्यरुग्ण (oPD/daycare) स्वरूपात विद्युत उपचार घेणारे रुग्ण उपचार झाल्या नंतर 3 तासात आपल्या घरी जाऊ शकतात  

 

धन्वंतरी मध्ये येणारे बहुतांश रुग्ण 6 ते 12 विद्युत उपचाराची सत्रे घेतात. ही उपचार पद्धती पूर्ण व्हायला साधारण 3 ते 4 आठवड्याचा काळ लागतो. बहुतांश अचानक उद्भवलेल्या आजारांमध्ये ही सत्रे पुरेशी असतात. परंतु, चिवट, जुनाट, दीर्घकाळ उपचार न घेतल्याने राहिलेली लक्षणे असल्यास, maintainance ect ची गरज भासू शकते. याविषयी ची सर्व चर्चा तुमच्या मानसोपचार तज्ञ डॉक्टर (Psychiatrist) सोबत करून घ्या. 

 

गेल्या ४ दशकांचा अनुभव, व उपचारांनंतर रुग्णांनी दिलेला अभिप्राय यापासून विद्युत उपचार अधिकाधिक प्रभावी, सुरक्षित, वेदनारहित, व सहज कसे होतील या दृष्टीने धन्वंतरी नर्सिंग होम न्यूरोसायकियाट्री सेंटर प्रयत्नशील आहे व राहील.

विद्युत-उपचार: वैद्यकीय शास्त्रातील महत्वाचा उपचार: 

विद्युत उपचार सुचवल्यावर अनेक वेळा रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक बिचकतात, किंवा उपचार नाकारतात. हे करताना बहुतांश वेळेस  त्यांच्या मनात उपचारासंबंधीचे अपसमज, गैरसमज किंवा चुकीच्या कल्पना असतात. या कल्पना बहुतेक वेेळेस सिनेमा, किंवा सिरियल पाहून, किंवा एैकीव माहितीवर आधारित असतात. 

Electroconvulsive Therapy Near Me

समज १: विद्युत उपचार हे कालबाह्य आहेत, आणि केवळ मानसोपचार शास्त्रात वापरले जातात. 

विद्युत प्रवाहाचा वापर करुन आजारांवर उपचार करणे ही काही नवी गोष्ट नाही. हजारो वर्षांपूर्वीपासून, रोमन व ग्रीक साम्राज्यात विद्युत निर्माण करणारे मासे (Eels) यांचा वापर करुन, डोकेदुखी, स्नायूंमधील वेदना कमी करण्याचा प्रयत्न झालेला आ. 

आत्ताच्या काळात, केवळ मानसोपचारच नव्हे, पण वैद्यक शास्त्रातील जवळ जवळ प्रत्येक शाखेमध्ये विद्युत प्रवाह वापरुन उपचार केले जातात. त्यामध्ये, त्वचेवरील वांग किंवा डाग काढणे, Tatoo काढणे, अशा साध्या उपचारापासून, ह्रदयाची गती ठरवणारा पेसमेकर बसवणे, शरीरात इन्शुलिन ची पातळी ठरवणारा पंप बसवणे या सगळ्या उपचाराचा आधार विद्युत प्रवाह हाच आहे. 

शस्त्रक्रिया करताना, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी विद्युत डागणी (electro-cautery) वापरली जाते, व ह्रदय बंद पडल्यावर (cardiac arrest) सुरु करण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी ह्दयाला विद्युत प्रवाहाने चेतवले जाते (cardioversion). विदयुत मानसोपचार यापेक्षाा बिलकुल वेगळे नाहीत. किंबहुना, वर दिलेल्या सर्व उपचारांपेक्षा, विद्युत मानसोपचार (electroconvulsive therapy) जास्त प्रभावी आहेत, जास्त सुरक्षित आहेत, कमी वेळात परिणामकारक आहेत, आणि, नशिबाने, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या देशात, कायदेशीर पाठिंब्याने सहज उपलब्ध असून विमाकवचासहित मिळू शकतात. 

समज 2: विद्युत उपचार हे निषिद्ध असून, त्याला कोणतीही मान्यता नाही. 

वाचताना आश्चर्य वाटेल, पण मानसोपचार शास्त्रातील सर्व उपचार पद्धतींपैकी सर्वात सुरक्षित व उत्तम परिणाम कारक उपचारांच्या यादीत विद्युत उपचार स्थान मिळवेल, व त्या स्थानावर टिकून राहील. १९३० च्या दशकात शोध लागल्यापासून, विद्युत उपचार व त्याचे यश काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत, व म्हणूनच आजही आपले काम चोख करतच आहेत. 

भारतात, विद्युत उपचाराला कायदेशीर मान्यता आहे. १९८७ चा मानसिक आरोग्य कायदा असेल, किंवा २०१७ सालचा मानसिक आरोग्य सुविधा कायदा असेल, विद्युत उपचार करण्यास त्याने अत्यंत नि:संदिग्ध शब्दात मान्यता दिलेली आहे. इतकेच नव्हे, तर भारतातील अनेक खाजगी, व बहुतेक सरकारी विमा योजना (जसे आयुष्मान भारत, महात्मा फुले योजना इ.) या योजनांअंतर्गत विद्युत उपचाराला विमा कवच देखील आहे. ही बाब अतिशय महत्वाची आहे, कारण अनेक देशात, कायदेशीर अडचणी, मानवाधिकाराचा केलेला बाऊ व विमा संदर्भातील नियम यांमुळे विद्युत उपचार (ECT) सहज उपलब्ध होत नाहीत, व झाले तरी ते करणे आर्थिक दृष्ट्या अशक्यप्राय ठरते. अनेक देशांत आज, विद्युत उपचार करणयासाठी पुरेसे शिकलेले, व अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे.  या बाबतीत आपण भारतीय नेहमीच नशीबवान ठरलो आहोत, आपले कायदे हे खर्या अर्थाने पुरोगामी व प्रगतिशील राहिलेले आहेत.  

समज ३: विद्युत उपचार एकदा सुरु झाले की कधीच बंद होत नाहीत.

वर सांगितल्याप्रमाणे, तातडीने उद्भवलेल्या, किंवा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्युत उपचाराची ६ ते १२ सत्रे साधारणत: पुरेशी ठरतात. विद्युत उपचार हा आजारातून त्वरित मुक्त होण्याचा मार्ग आहे, आजारातून मुक्त राहण्याचा नव्हे

विद्युत उपचार घेतल्यानंतरही, बाकीचे उपचार, जसे औषधे, जीवनपद्धतीतील बदल, व्यायाम, psychotherapy, हे करत राहणे गरजेचे असते. अनेकदा रुग्ण बरे वाटल्यावर सर्व उपचार मध्येच बंद करतात, अनेकदा दुसर्या आजाराच्या प्रभावामुळे मानसिक आजार पुन्हा बळावतो, अन्य अडचणीमुळे औषधे मिळण्यास अडचण होते. अशा वेळेस, पुन्हा काही विद्युत उपचार करावे लागू शकतात, पण हा अपवाद आहे. बहुतेक सर्व पेशंट, जे सर्व उपचार पूर्ण करतात, व पथ्यं पाळतात, त्यांना तसे करावे लागत नाही. 

काही आजार मात्र इतके चिवट झालेले असतात, किंवा पुढे निघून गेलेले असतात, की त्यांना मधून मधून maintainance ECT ची गरज भासते, व ते सतत घ्यायला लागू शकतात. मात्र हा देखील अपवादच आहे. 

समज 4: विद्युत उपचार हे केवळ शेवटच्या टप्प्यात, किंवा इतर सर्व मार्ग हारल्यानंतर केले जातात. 

"डॉक्टर, अमुक अमुक ना पण विद्युत उपचार सुचवले होते, त्यांची केस अगदीच हाताबाहेर गेलेली होती. आमचे पेशंट तर तसे नाहीत, मग आम्हाला का सुचवताय ही ट्रीटमेंट?" असा प्रश्न बर्याचदा विचारला जातो.

विद्युत उपचार सुचवताना, आजाराची तीव्रता हा भाग तर असतोच, पण त्यापेक्षा महत्वाचं असतं, आजारामुळे होणारं नुकसान (biological disadvantage). अनेक मानसिक आजारांत, उपचाराविना जास्त काळ राहणे यामुळे दीर्घकाळ होणारे सामाजिक दुष्परिणाम सहन करावे लागतात. जास्त काळ मानसिक आजार, हा मेंदूची कार्यक्षमता, व इतर उच्च कार्ये यांवर प्रभाव टाकतो. अनेकदा, आजारातून पटकन््बरे होणे हे आवश्यक असते (therapeutic concern), जसे वर्षभर अभ्यास केलाय, पण परिक्षेच्या २-३ आठवड्यापूर्वी मानसिक आजाराचा त्रास होणे. अशा वेळेस, केवळ औषधे वापरुन परीक्षेच्या आधी हुकमी बरे होता येईल की नाही हे सांगणे अवघड आहे. अशा अवघड प्रसंगी विद्युत उपचार वापरले जातात.  

 

विद्युत उपचार हे सुचवताना आजाराची गरज, आणि रुग्णाची गरज या दोन्ही मुद्द्यांचा विचार करुन सुचवलेले असतात. तुमच्या मानसोपचारतज्ञांनी असा सल्ला दिल्यास तो खुल्या मनाने स्वीकारा. इतरांशी, इतर रुग्णांशी आपली तुलना करु नका.  

समज 5: विद्युत उपचार हे वेदनादायी, धोकादायक  असतात. उपचारानंतर रुग्ण कधीच नॉर्मल माणसासारखा राहू शकत नाही. 

  • आधुनिक विद्युत उपचार हे संपूर्ण भूल (general anaesthesia) देऊन केले जातात, त्यामुळे ते पूर्णत: वेदनारहित असतात. भूल उतल्यानंतर देखील, रुग्णाला कोणतीही वेदना होत किंवा राहत नाही. 

  • कोणत्याही आधुनिक शस्त्रक्रियेप्रमाणे, विद्युत उपचार करताना, रुग्णाचे श्वसन, ह्रदय, इतर शरीर क्रिया यांची पूर्ण निगराणी व काळजी तज्ञ व अनुभवी भूलतज्ञ (anaesthesiologist) घेत असतात. 

  • विद्युत उपचार करण्यापूर्वी रुग्णाची शरीरीक स्थिति उपचार व भूल सहन करण्यासाठी योग्य आहे की नाही हे नीट तपासून घेतले जाते. त्यासाठी रक्ताची तपासणी व ecg तपासला जातो. फिटनेस नसेल तर विद्युत उपचार केले जात नाहीत. 

  • ​विद्युत उपचार जरी 1930 दरम्यान शोधले गेले असले, तरी काळानुसार, उपचारासाठी वापरली जाणारी equipments, औषधे  व झालेले संशोधन याच्या सहाय्याने आजचे विद्युत उपचार हे आधुनिक, वेदनारहित आणि सुरक्षित झालेले आहेत. 

  • विद्युत उपचाराची सर्व सत्रे होईपर्यंत रुग्णाला काही पथ्ये पाळावी लागतात, व काही गोष्टी करण्यापासून थांबावे लागते. ही सत्रे पूर्ण होईपर्यंत, तात्काळची स्मरणशक्ती (immediate memory) वर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. मात्र हा परिणाम जसा वेळ पुढे जाईल तसा भरुन निघतो, व रुग्णाची दीर्घकालीन स्मरणशक्ती (long term memory), शिकलेली कौशल्ये (procedural memory) यांवर काहीही परिणाम होत नाही. ही पथ्ये वाचण्यासाठी ची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. 

  • उपचाराची सत्रे पूर्ण झाल्यानंतर, व आजारातून मुक्त झाल्यानंतर रुग्ण पूर्वीची सर्व कामे, अभ्यास, व जबाबदार्या पार पाडू शकतो, व कोणतेही बंधन अथवा पथ्य पाळावे लागत नाही. 

ELectroconvulsive treatment psychiatrist in Kolhapur

Recovery from ECT

विद्युत उपचार पूर्ण झाल्यावर घ्यायची काळजी, पाळावयाची पथ्ये. 

Contact Us

Dhanvantari Nursing Home Neuropsychiatry Centre

331, E, Off Wilder Memorial Church. New Shahupuri.

Kolhapur. 416001. Maharashtra, India. 

Phone: +91-2312662520

Mobile: +91-9167577279

bottom of page